Ahmadnagar breaking : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या तब्बल २८ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे पक्षाकडे पाठविले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ उपोषणाची दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
शिंदे सेना गटाचे उपजिल्हाप्रमुख अण्णा म्हसे, जयवंत पवार यांच्यासह अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संपत महाराज जाधव, जिल्हा उपाध्यक्ष गोरक्षनाथ रामफळे, दक्षिण उपजिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत कर्डिले, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख शाम गोसावी यांच्यासह शेतकरी सेना तालुकाप्रमुख किशोर मोरे, शिवसेना अध्यात्मिक आघाडी श्रीरामपूर तालुकाप्रमुख वसंत खरात,
नेवासा तालुकाप्रमुख सोमनाथ महाराज पाटील, राहुरी तालुकाप्रमुख बाळासाहेब मुसमाडे, किरण देशमुख, पारनेर तालुकाप्रमुख अनिल टेकूडे अकोले तालुकाप्रमुख तुकाराम आरोटे, शेवगाव तालुकाप्रमुख कल्याण महाराज काळे,
राहाता तालुकाप्रमुख संतोष दीक्षित, कोपरगाव तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत कर्डिले, नगर तालुकाप्रमुख राजराजेश्वर शास्त्री, श्रीगोंदा तालुकाप्रमुख अक्षय मोरे, संगमनेर तालुकाप्रमुख दिलीप पवार यासह २८ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.