Maharashtra News : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढत आहे. राज्यातील ९० हजार ७०० पैकी ६२ हजार मतरदार केंद्रावर पक्षाने तयारी केली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाने बारामती, शिरूर, परभणी, माढा, नगर, नंदुरबारसह संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेची जोरदार तयारी केली आहे.
राज्यात माझ्या पक्षाचे आमदार-खासदार होणार हे नक्की आहे. त्यामुळेच भाजप व काँग्रेस बरोबर येण्यासाठी माझ्या मागे लागले आहेत. मात्र, येणारी लोकसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरच लढणार आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी यांची उमेवारी जाहीर करीत असून, त्यांना विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा पदाधिकारी मेळावा जानकर यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रदेश सचिव रवींद्र कोठारी, डॉ. प्रल्हाद पाटील, शरद बाचकर, शहाजी कोडकर, सुवर्णा जहाड, मंदाकिनी बडेकर, नाना जुंदरे आदी उपस्थित होते.
ओबीसी मुख्यमंत्री झाल्याशिवाय…
जानकर म्हणाले, की राज्यात ओबीसी, भटक्या विमुक्त जाती-जमातींना कोणीही वाली नाही. त्यामुळे राज्यात या समाजाची अवस्था सैरभैर झाली आहे.
त्यामुळे ओबीसी मुख्यमंत्री झाल्याशिवाय या समाजास न्याय मिळणार नाही. यासाठी सर्व ओबीसी, भटक्या समाजाने एकत्र यावे. आज गोपीनाथ मुंडे असते, तर हे समाज सैरभैर झाले नसते, असे ते म्हणाले.