Sadabhau Khot : ते ओसाड गावचे पाटील! सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांना टोला

Ahmednagarlive24 office
Published:

Sadabhau Khot  : शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात गौतम अदानींचे कौतुक करण्यात आले आहे. यावरून सदाभाऊ खोत म्हणाले, पवार साहेबांच्या पुस्तकात शेतकऱ्यांचे कौतुक झालं नाही, परंतु अदानींचं झालं. ते ओसाड गावचे पाटील आहेत. त्यांच्या बोलण्याला फारसा अर्थ असत नाही, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केली आहे.

तसेच राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अजित पवार यांच्यामुळे होत नाही, असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. कारण त्यांचा मुहूर्त अजून ठरत नाही. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत सर्वजण आहेत. विरोधकांकडूनही वारंवार विस्ताराबाबत बडे दावे करण्यात येत आहेत.

अनेक आमदार यासाठी इच्छुक आहेत. सध्या एका एका मंत्र्यांकडे अनेक खाती देण्यात आली आहेत. दरम्यान यासाठी सदाभाऊ खोत यांनी अजित पवार यांनाच कारणीभूत ठरवले आहे. ते म्हणाले, अजित पवार यांचाच मुहूर्त अजून ठरत नाही. शपथविधी कधी घ्यायचा? हे नक्की झालं की मंत्रिमंडळ विस्तार होईल.

दरम्यान, सात महिने झाले तरी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, यावरून अजित पवार यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. नऊ महिन्यात बाळ जन्माला येत, पण इथे सरकारला सात महिने झाले तरी विस्तार होत नाही, असे ते म्हणाले होते.

दरम्यान, राज्यात अजून मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. आता काही दिवसात अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. यामुळे याआधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe