Sambhaji Raje : 2024 च्या सर्व निवडणुका स्वराज्य संघटना लढवणार असल्याची घोषणा माजी खासदार व स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. यामुळे आता यामध्ये त्यांना किती यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वराज्य संघटनेची पहिली जाहीर सभा नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे झाली.
संभाजीराजे म्हणाले, आता छत्रपती शिवाजी महाराजांसारखे स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न तर करु. स्वराज्य संघटना देखील आता राजकीय पक्ष म्हणून समोर आली आहे. स्वराज्य म्हणजे तुमचं राज्य. 2024 मध्ये तुमच्या हातात सगळं आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

तुम्हांला आताचे पुढारी पाहिजेत की सुसंस्कृत पुढारी पाहिजे हे तुम्हाला निवडायच आहे. तुम्ही ताकद द्या, 2024 मध्ये बदल दिसेल, असे म्हटले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साडेतीनशे वर्षानंतर देखील शिवाजी महाराजांच्या वंशजांवर लोकं तितकेच प्रेम करतात.
राजकीय गुण माझ्यात नाही. पण नशिबाने मला फसवले म्हणून माझ्यात चीड निर्माण झाली, असेही ते म्हणाले. राज्यात सध्या वाईट परिस्थिती आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणेची दूरवस्था आहे. 6 फेब्रुवारी रोजी धाराशिवमधील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली.
एक महिना झाला, पण काहीच सुधारणा झाली नाही. यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील संभाजीराजे यांनी केली आहे. तसेच विशालगडाची दूरवस्था झाली आहे, तिथलं अतिक्रमण हटवा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.