Sambhajinagar : सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये नामांतराचा वाद सुरूच आहे. असे असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या औरंगजेबाची कबर काढून टाका अशी मागणी शिरसाट यांनी केली आहे.
यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा वाद आता अजूनच पेटल्याची शक्यता आहे. ते म्हणाले, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी करणार असल्याचे शिरसाट म्हणाले आहे. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या नामांतराविरोधात येथील खासदार आंदोलन करत असताना आता नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याने याचा सर्वात जास्त दु:ख हैदराबादींना झाले आहे.
शहराचे नाव बदलणे म्हणजे अत्याचारी औरंगजेबाविरोधातील हा लढा आहे. त्यामुळे याचं वाईट वाटायचं कारण काय आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. औरंगजेबाचे तुम्ही काय वंशज आहात का? असेही ते म्हणाले.
औरंगजेबाच्या कबरेचे अवशेष आमच्या येथे नको. त्यामुळे ही कबर काढून घ्यावी अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली आहे. यामुळे चर्चा सुरू झाली आहे.