Sandeep Deshpande : आज सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. हल्ल्याची माहिती मिळताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्व नेते रुग्णालयात पोहोचले. आता यामागे कोण आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आता या हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीच मनसेने केली आहे. मनसेने थेट या हल्लाप्रकरणात संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे संशयाची सुई नेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यामुळे आता एकच चर्चा सुरू झाली आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनीही संदीप देशपांडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. महाराष्ट्रातील चिंधीचोर गुंड आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा. संदीप देशपांडे वारंवार पालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत.
त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलिसांना विनंती आहे की त्यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना ताब्यात घ्यावं. त्यांची चौकशी करावी. चौकशीत तथ्य आढळल्यास त्यांनी अटक करावी, असे खोपकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातून संदीप देशपांडे थोडक्यात बचावले. मात्र, शिवाजी पार्क सारख्या वर्दळीच्या परिसरात हा हल्ला झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.