Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. आता याबाबत देशपांडे यांनी स्वतः माहिती दिली आहे.
देशपांडे म्हणाले, आम्ही कुणालाही घाबरत नाही, घाबरणार नाही. असा घाबरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आम्ही कुणालाही भीक घालत नाही. यामध्ये कोण लोक आहेत हे सर्वांना माहिती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच ते म्हणाले, अशा हल्ल्यांना मी घाबरणार नाही. मी माझं काम करत राहील. ज्यांना वाटतं मी या हल्ल्याने घाबरेल त्यांना मी स्पष्टपणे सांगतो की, याने मी घाबरणार नाही, असंही संदीप देशपांडेंनी सांगितले आहे.
दरम्यान, सकाळी मॉर्निग वॉक दरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यांच्या डोक्यावर क्रिकेटच्या स्टंपने, रॉडने हल्ला करण्यात आला आहे. पण देशपांडे यांनी स्वतःचा बचाव केला. मात्र, त्यांच्या पायाला लागलं आहे. यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, संदीप देशपांडे मॉर्निग वॉकला गेले असता त्यांच्यालर चार अज्ञातांकडून हल्ला झाला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. हल्लेखोर मास्क लावून आले होते.
सध्या पोलिस त्यांचा तपास करत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. संदीप देशपांडे गेल्या काही दिवसांपासून अनेक वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. तसेच त्यांनी केलेल्या ट्विटमुळे देखील ते चर्चेत असतात.