Sangram Jagtap News : नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यांच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे. जगताप यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. आमदार जगताप यांच्या प्रचाराला मतदार संघातील महिला अन तरुण वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळतोय.
ज्येष्ठ नागरिक देखील जगताप यांच्या सभेला गर्दी करतायेत. दरम्यान, नगर येथील खान्देश मित्र मंडळाने देखील आता जगताप यांच्या विजयासाठी अन त्यांना मंत्री बनवण्यासाठी प्रयत्न करणार असा निर्धार केला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शहरातील खानदेश मित्र मंडळाचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला.
या मेळाव्यास नगर शहरातील स्थायीक असणारे खान्देश परिवारातील बांधव, भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मेळावा यंदा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या स्नेह मेळाव्यास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी सचिन जगताप यांचा खानदेश मित्र मंडळाकडून सत्कार करण्यात आला.
या मेळाव्या प्रसंगी सचिन जगताप यांनी उपस्थित लोकांना संबोधित केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सचिन जगताप यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांना मतदान करून नगर शहराची सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी द्यावी असे आवाहन केले.
पुढे बोलताना सचिन जगताप यांनी, आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहरातील सर्व घटकांना बरोबर घेऊन न्याय देण्याची भूमिका घेण्यात येईल. नगर मेट्रो शहर करण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा, उद्योग, व्यवसाय, इंडस्ट्री नगर शहरात उभे करण्यासाठी प्रयत्न होतील.
आतापर्यंत नगर शहराला रस्ते व इतर उपक्रमासाठी आमदार जगताप यांच्या प्रयत्नातून मोठा निधी उपलब्ध झालाय. शहरात काँग्रॅटीकरण रस्त्यासह इतर अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.
दरम्यान, खान्देश मित्र मंडळाच्या विकासासाठी सुद्धा आ. संग्राम भैय्या जगताप यांच्या माध्यमातून कामे केली जातील असे आश्वासन सचिन जगताप यांनी यावेळी उपस्थित लोकांना दिले. यावेळी सचिन जगताप यांनी खानदेश मित्र शुभेच्छा दिल्यात.
विशेष बाब अशी की, यावेळी खानदेश मित्र मंडळाच्या वतीने आ. संग्राम जगताप यांना मोठ्या संख्येने मतदान करून आमदाराचे, मंत्री करण्यासाठी भक्कमपणे त्यांच्याबरोबर उभे राहू अशी ग्वाही देण्यात आली. खरे तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे अन मतदानानंतर तीन दिवसांनी अर्थातच 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल.
अर्थातच, मतदानाला आता फक्त पाच दिवसांचा काळ बाकी राहिलाय. दरम्यान मतदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याने नगर शहर विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार कोण असेल? याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. पण या मतदार संघाचा पुढचा आमदार कोण असेल? हे 23 तारखेलाच क्लिअर होणार आहे.