Sangram Jagtap News : गेल्या काही वर्षांमध्ये नगर शहरात विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत. आमदार संग्राम जगताप व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून शहरातील बहू प्रतिक्षित उड्डाणपुलाचे काम मार्गी लागले आहे. याशिवाय, शहरातील विविध रस्ते मार्गांची कामे पूर्ण झालीत.
दरम्यान आता शहरातील आणखी एक महत्त्वकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. नगरमधील महत्त्वाकांक्षी असा अमृत भुयारी गटार योजना पंपिंग स्टेशन व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प येत्या काही दिवसांनी पूर्ण होणार आहे.
या प्रकल्पासाठी आमदार जगताप यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात आहे. विशेष बाब अशी की येत्या काही दिवसांनी हा प्रकल्प सुरू होणार आहे. यामुळे सीना नदी स्वच्छ होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या प्रकल्प अंतर्गत शहरातील सीना नदीमध्ये सोडलेले दूषित पाणी आता पाईपलाईनद्वारे थेट सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये घेऊन जाण्याचे काम केले जाणार आहे.
दरम्यान आता सीना नदीचे रुंदीकरण, खोलीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्वतः आमदार जगताप यांनीचं ही माहिती दिली आहे. त्यामुळे सीना नदी स्वच्छ, सुंदर होणार आहे.
दरम्यान हा प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याने शहरातील एक-एक प्रकल्पाचे काम हाती घेऊन पूर्ण होत असल्याचा आनंद होत असल्याचे आमदार जगताप जगताप यांनी म्हटले आहे.
आमदार जगताप आणि महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी फुलसौंदर मळा येथील अमृत भुयारी गटार योजना प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली आहे. यावेळी इतर अनेक प्रमुख अधिकारी सुद्धा उपस्थित होते.