..….म्हणून माझा विजय निश्चित झाला, आता पुढील पाच वर्ष आपण सर्वजण मिळून शहर विकासाला गती देऊ : आ. संग्राम जगताप

Tejas B Shelar
Published:
Sangram Jagtap News

Sangram Jagtap News : अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघापैकी एक सर्वाधिक चर्चेतला मतदारसंघ म्हणजे नगर शहर. या मतदारसंघात यावेळी महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप अन शरद पवार गटाच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून येथे जोरदार प्रचार सुरू आहे.

दरम्यान, महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम भैया जगताप यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप हे मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत. त्यांनी नुकतीच शहरातील मंगल गेट परिसरामध्ये विकास यात्रा काढली.

या विकास यात्रेत त्यांनी या भागातील नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी जगताप यांनी, शहरामध्ये फिरत असताना मिळत असलेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे माझा विजय निश्चित झाला असून पुढील पाच वर्ष आपण सर्वजण मिळून शहर विकासाला गती देऊ त्या माध्यमातून विकसित शहर निर्माण करू असे म्हणतं आपल्या विजयाचा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे.

ते म्हणालेत की, आपल्या शहरातील एमआयडीसी मध्ये आता मोठमोठे उद्योग कारखाने येतील. त्या माध्यमातून युवक युवतींना रोजगार उपलब्ध होईल व आपल्या शहराची आर्थिक उन्नती झपाट्याने होणार आहे.

नगरची डाळ मंडई ही महाराष्ट्रातील अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळखली जात आहे. झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे शहराचे विस्तारीकरण वाढत असून व्यापारीकरणाला अजून गती प्राप्त होईल असे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले आहे.

या विकास यात्रेसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या समवेत स्थायी समितीचे माजी सभापती सचिन जाधव,वर्चस्व ग्रुपचे अध्यक्ष सागर मुर्तडकर,माजी नगरसेविका अश्विनी जाधव,योगेश गलांडे,डॉक्टर विजयकुमार भंडारी,कमलेश भंडारी,सुनील लालबोंद्रे,

रविंद्र लालबोंद्रे,सलोनी शिंदे,विमल परदेशी,दिगंबर गेट्याल,सुनील खताडे, प्रल्हाद जोशी,विनोद शिरसाट,समीर गवळी, वैभव काळे,सुनील भिंगारदिवे,मयूर कटारिया,अभिषेक भोसले,मयूर मैड आदीसह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी मतदार संघात विकास यात्रेच्या माध्यमातून जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. आता येत्या काही तासात प्रचाराचा झंझावात शांत होणार आहे. येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसते.

याचं पार्श्वभूमीवर संग्राम जगताप यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करत यंदा पुन्हा विजय संपादित करू असा विश्वास व्यक्त केलाय. यामुळे 23 तारखेला नगर शहर विधानसभा मतदारसंघाचा निकाल काय लागणार याकडे साऱ्यांचेच लक्ष राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe