आ. जगताप यांना निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा ! निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जावरील हरकत फेटाळली

Published on -

Sangram Jagtap News : अहिल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघातून आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. या विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.

महायुतीमध्ये ही जागा अजित पवार गटाला सुटली अन येथून पुन्हा एकदा पक्षाने आमदार जगताप यांना उमेदवारी देण्याचा मोठा निर्णय घेतलाय. दरम्यान, आमदार जगताप यांना निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

खरेतर जगताप यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जातील माहितीवरून अपक्ष उमेदवार किरण गुलाबराव काळे यांनी आक्षेप घेतला होता. निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी या हरकतीच्या अनुषंगाने आ. जगताप यांना नोटिस काढली होती. त्यावर काल बुधवारी दुपारच्या वेळात एक महत्त्वाची सुनावणी झाली.

दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप आणि त्यावरील म्हणणे, पुरावे विचारात घेऊन रात्री उशिरा काळे यांनी दाखल केलेली हरकत याचिका फेटाळली आहे. अर्थात आ. जगताप यांचा अर्ज वैध ठरला आहे. या मतदार संघात 27 इच्छुकांनी 37 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

यापैकी तीन लोकांचे अर्ज अवैध ठरले आहेत. तसेच, 24 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले गेले आहेत. आ. जगताप यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जातील माहितीवरून अपक्ष उमेदवार काळे यांनी बुधवारी छाननी दरम्यान हरकत घेतली होती.

त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी दुपारी सुनावणी ठेवली होती. यावर दोन्ही बाजूचे म्हणणे मांडण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून घेत आ. जगताप यांचा अर्ज वैध ठरविला आहे.

यामुळे विद्यमान आमदार जगताप यांना दिलासा मिळाला आहे. सध्या या जागेवर महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी दिसत आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार गटाला सोडण्यात आली असतानाही येथून काँग्रेस

आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. यामुळे मविआमधील बिघाडी पुन्हा एकदा समोर आली आहे आणि यामुळे जगताप हे प्रचारात आघाडीवर गेले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe