Sanjay Raut : दादा कमाल की चीज! राणेंना बाईनं पाडलं, बाईनं, अजितदादांचा व्हिडिओ बघताच राऊतांकडून कौतुक

Published on -

Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर काल जोरदार टीका केली होती. पुण्यातील सभेत अजित पवार म्हणाले होते की, नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर दोन वेळा निवडणुकीत पडले. एकदा कोकणात तर एकदा मुंबईत पडले होते.

दादा येवढ्यावरच थांबले नाहीत, तर ते पुढे म्हणाले, तसेच मुंबईत तर त्यांना एका महिलेने पाडले. बाईनं पाडलं बाईनं असे म्हणताच एकच हशा झाला. ज्यांनी ज्यांनी शिवसेना फोडली ते सगळे पडले, असे अजित पवार म्हणाले होते.

यावरून आता संजय राऊत यांनी अजित पवारांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, दादा म्हणजे कमाल की चीज आहेत, असे म्हणत संजय राऊतांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश! जय महाराष्ट्र असे टि्वट राऊत यांनी केले आहे.

दरम्यान, नारायण राणे यांना बाईने पाडलं, बाईनं असे म्हणताना अजितदादांनी केलेले हातवारे अनेकांनी स्टेटसला ठेवले होते. अजित पवार म्हणाले, शिवसेना फोडणाऱ्यांचा विजय झालेला नाही. त्यांना मतदारांनी जागा दाखवली आहे. छगन भुजबळ यांच्यासहीत सगळ्यांना पाडण्याचे काम केले आहे.

दरम्यान, काल अजित पवारांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली होती. पुण्यातील पोट निवडणुकीमुळे सध्या ते पुण्यात ठाण मांडून आहेत. यामुळे सध्या राजकीय आरोप सुरू आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. आता रविवारी मतदान होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe