Sanjay raut : राज्यात खळबळ! राहुल कुल यांच्यानंतर आता संजय राऊतांचे थेट कॅबिनेट मंत्र्यावर आरोप..

Published on -

Sanjay raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एका ट्वीटमध्ये मंत्री दादा भुसे यांचे थेट नाव घेऊन गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधी रूपयांचे शेअर्स जमावल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. एवढे शेअर्स घेऊनही वेबसाईटवर मात्र अत्यंत कमी रकमेचे शेअर्स दाखवल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे.

सध्या राऊत शिंदे – फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी आमदार राहुल कुल यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप केले होते. यानंतर आता राऊत यांचे पुढचे लक्ष्य मंत्री दादा भुसे ठरले आहेत.

दरम्यान, त्यामुळे राऊत आता सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची मालिका सुरू करत आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दादा भुसेंचा फोटो त्यांनी ट्वीटमध्ये शेअर करत राऊत म्हणाले, हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्याविरोधात रस्त्यावर आले आहेत.

दरम्यान, गिरणा अॅग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले गेले. असे असताना कंपनीच्या वेबसाईटवर मात्र फक्त १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स आहेत. तेही फक्त ४८ सभासदांच्या नावावर दाखवण्यात आले आहेत.

ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल, असे ट्विट त्यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राऊत हे अनेक नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe