Sanjay Raut : फासे पलटले! विधिमंडळाला खासदारावर हक्कभंग आणता येतो का? आता सगळा गेमच फिरला..

Sanjay Raut : सध्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन त्यांच्याविरोधात ‘हक्कभंग’ आणावा, अशी मागणी केली.

असे असताना राऊतांच्या वक्तव्यावरुन प्रचंड गोंधळ झाल्याने विधिमंडळाची दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हक्कभंग समितीची घोषणाही केली. असे असताना मात्र राज्यसभा सदस्यावर असा हक्कभंग दाखलच करता येत नाही, अशी माहिती समोर येत आहे.

यामुळे राऊत हे वाचू शकतात. विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या मते विधिमंडळाला हा अधिकार नाही. संसदीय पद्धतीप्रमाणे असा अधिकार फक्त राज्यसभेलाच आहे. यामुळे सध्या ही समिती काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यसभेच्या सदस्यावर हक्कभंग प्रस्ताव विधिमंडळाला आणता येत नाही. त्यासाठी संसदीय प्रथा परंपरा आणि विशेष हक्कभंगाचा कायद्याचा अवलंब करता त्यांनी हे प्रकरण राज्यसभेकडे पाठवले गेले पाहिजे. तो अधिकार देखील तिकडेच आहे.

संजय राऊत राज्यसभेचे सदस्य असल्याने त्यांच्याविरोधात हक्कभंग आणण्यासाठी राज्यसभा हेच योग्य सभागृह आहे. राज्यसभेचे माननीय सभापती जे देशाचे उपराष्ट्रपती असतात ते यासंदर्भात पुढील कारवाई करतील असेही ते म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं ते विशेष हक्कभंगाच्या कारवाईस पात्र ठरत. सभागृहाचा आणि सभागृहातील सदस्यांचा अवमान झाल्याचं सकृतदर्शनी दिसत आहे, पण कारवाई होऊ शकत नसल्याचे सांगितले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe