Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी करून मलाही तुरुंगात मारण्याचा प्रयत्न झाला होता, असा गौप्यस्फोट त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊत सध्या तुरुंगातून सुटून आले आहेत. अनेक दिवस ते जेमध्ये होते. तसेच ते म्हणाले, रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या साधी नाही.
यामागे राजकीय षड्यंत्र आहे. वारिसे यांच्या हत्येवेळी आजूबाजूचे तीन सीसीटीव्ही एकाच वेळी बंद कसे होते ?, असा सवाल करून या प्रकरणाचा नि:पक्षपणे तपास होईल का याबाबत शंका असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. अशा घटना बिहारमध्ये होत होत्या.

आता महाराष्ट्राचा बिहार झाला आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामागे कोण आहे याचा तपास होणे आवश्यक आहे. राज्यात आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती आहे, असेही राऊत यांनी सांगितले आहे. या हत्येच्या कटात कोण सहभागी आहे, याचा तपास होणे गरजेचा आहे.
सिंधुदुर्गात राजकीय हत्यांची परंपरा आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सरकारने नियुक्त केलेल्या एसआयटीत ११ अधिकारी कोण आहेत, हे समजले पाहिजे. वारिशे यांच्या कुटुंबियांचा आक्रोश सरकारने ऐकला पाहिजे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच राऊत म्हणाले, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर दबाव आणला जात आहे. लोकशाहीचे मुखवटे लावून देशात दहशत पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात लोकशाही आहेच कुठे? बीबीसीवरील छापे हे माध्यमांना दिलेल्या इशारा आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.