मुंबई : शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय बांगर यांना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. यानंतर संजय बांगर आक्रमक झाले आहेत. बांगर यांच्या समर्थनार्थ मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना माझी शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड झाली होती. मी कोणतीही चूक केलेली नाही. मी प्रसारमाध्यमांमध्ये मला पदावरुन हटवण्यात आल्याचे वृत्त पाहिले. पण मी पदावरुन हटलेलो नाही. मला कोणीही जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवू शकत नाही. मी आजही शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे आणि उद्याही राहणार, असे संतोष बांगर म्हणाले आहेत.

कोणीतरी उद्धव ठाकरेंची दिशाभूल करत आहे. मला उद्धव ठाकरेंना इतकंच सांगायचे आहे की, दिशाभूल करणाऱ्यांना बाजूला करा. गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला. आपण खरंच चांगले नेते आहात, असे संतोष बांगर म्हणाले आहेत.