Shahaji Bapu Patil : शहाजी बापू पाटलांविरोधात तालुक्यातील 45 सरपंच बसलेत उपोषणाला, नेमकं प्रकरण काय?

Published on -

Shahaji Bapu Patil : ‘काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल एकदम ओके’ असा डायलॉग आठवला की आमदार शहाजीबापू पाटील यांची आठवण होते. यामुळे ते राज्यभर चर्चेत आले. असे असताना आता ते वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. आमदार शहाजी बापू पाटील आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या विरोधात सध्या येथील सरपंच उपोषण करत आहे.

सोलापूरमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून हे बेमुदत उपोषण केले आहे. शेकाप पक्षाची ज्या ग्रामपंचायतींमध्ये सत्ता आहे त्या ग्रामपंचातींची विकास कामे राजकीय दबावापोटी प्रलंबित करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी हे उपोषण करण्यात येत आहे.

सांगोला तालुक्यातील शेकापच्या 45 सरपंचांनी आपला विरोध दर्शविला आहे. सांगोला तालुक्यात शेकापच्या ग्रामपंचायतीमधील दलित विकास निधीबाबत अनियमितता प्रशासनाकडून झाली आहे. तसेच जलजीवन मिशन मधील कामात भ्रष्टाचार केला जातोय. त्यामुळे याची चौकशीची मागणी केली जात आहे.

दरम्यान, आमदार शहाजी बापूंना आमचे आव्हान आहे, त्यांनी याबाबत खुलासा करावा. संबंधित निधी वाटपातील अधिकाऱ्यांना कार्यमुक्त न केल्यास जिल्हा परिषदेला टाळ ठोकणार असल्याचा इशारा शेकापच्या सरपंचांनी दिला आहे.

दरम्यान, या उपोषणामध्ये जवळपास शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते सांगोल्याहून सोलापुरमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे शहाजी बापू पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe