Sharad Pawar : सध्या केंद्रीय तपास यंत्रणा या देशातील विरोधी पक्षांना टार्गेट करत आहे. यामुळे अनेक नेते अडचणीत आले असून याचा गैरवापर केला जात असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या वाढत्या कारवायांनंतर प्रादेशिक पक्षाच्या 9 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहेत. तसेच या पत्रात विरोधी पक्षातील नेत्यांनी काही गंभीर आरोप केले आहे. आता मोदी या पत्राची दखल घेणार का हे लवकरच समजेल.

यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव,पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सपा नेते अखिलेश यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा समावेश आहे.
या पत्रात गेल्या काही वर्षातील उदाहरण देत केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तुमचे सरकार आल्यापासून 2014 पासून विरोधी पक्षातील नेत्यांवर गुन्हे, अटक, धाडी आणि चौकशा सुरू असल्याचे म्हटले आहे.
जे नेते भाजपवासी झाले, त्यांची चौकशी बंद झाल्याचे म्हटले आहे. तसेच पत्रात राज्यपालांच्या भूमिकांबद्दलही पत्रात टीका केली आहे. विविध राज्यातील राजभवन लोकशाही सरकाराच्या कामात हस्तक्षेप करत आहेत.
राज्यपाल केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये वाढत्या दरीचे कारण ठरत आहेत, असेही म्हटले आहे. तसेच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली. कोणतेही पुरावे नसताना ही कारवाई करण्यात आली असल्याचे पत्रात सांगितले आहे.