Sharad Pawar : राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात असलेली शिवसेना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे. यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी याबाबत कसा गैरवापर केला जातोय ते सांगितले आहे. ते म्हणाले, शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांनी जन्म दिला. त्यांनी पक्षाची बांधणी केली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सागितले की, माझ्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पाहतील.

निवडणूक आयोगाने शिवसेना ज्यांनी स्थापन केली त्यांच्या हातात नाही दिली. निवडणूक आयोगाचा गैरवापर कसा होतो याचे उदाहरण आपण बघितले, शिवसेनेला दुसऱ्याच्या हाती देऊन टाकले. दिल्लीत देखील लोकांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना पसंती दिली म्हणून दिल्लीत केंद्र सरकार निवडणुका होऊ देत नाहीत.
निवडणूक आयोगाने तीन वेळा निवडणूक लावली. पण दिल्लीने रद्द केली. कारण त्यांना माहिती आहे की, ते राजधानीत हरतील. यातून हेच दिसतं की ज्यांच्या हातात सत्ता आहे ते विरोधी पक्षात काम करु देणार नाही, असेही पवार म्हणाले.
दरम्यान, आता कसबा निवडणुक खूप महत्त्वाची आहे. समाजात भाईचारा, एकोपा कसं ठेवायचं ते रवींद्र यांच्याकडे बघून कळतं. कुणी काहीही अफवा पसरवेल. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.