Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली! अखेर शरद पवार यांनी तीन वर्षांनी केले मोठे वक्तव्य

Ahmednagarlive24 office
Published:

Sharad Pawar : तीन वर्षांपूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेच शपथविधी घेतला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. असे असताना याबाबत नंतर कोणी काहीच बोलले नव्हते. असे असताना आता अनेक नेते वेगवेगळी वक्तव्य करत आहेत.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली. यामुळे आता हा शपथविधी शरद पवार यांना माहिती होता का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

त्यावेळी सरकार बदलायचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्याचा एक फायदा झाला, तो म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली असे पवार म्हणाले. राष्ट्रपती राजवट उठल्यानंतर काय झालं ते तुम्ही पाहिले असेल, असेही पवार म्हणाले. यामुळे सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे.

राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? दरम्यान, 2019 साली महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत पहाटे राजभवानावर जाऊन शपथ घेतली होती.

असे असताना मात्र ते सरकार काही वेळेतच कोसळले होते. देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत अनेक खुलासे केले होते. यामुळे याची बरीच चर्चा झाली. अजित पवार मात्र याबाबत अजूनही मौन बाळगून आहेत. त्यांनी याबाबत काही वक्तव्य केले नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe