Sharad Pawar : 3 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी घडून आल्याचा दावा नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावरून मोठे राजकारण सध्या रंगले आहे. आता पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवटीची कोंडी फुटली असे शरद पवार म्हणाले होते.
असे असताना आता मात्र आता हे वक्तव्य आपण तर मस्करीत केले असल्याचे सांगितले आहे. पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवटची कोंडी फुटली, हे वक्तव्य आपण मस्करीमध्ये, गमतीमध्ये केले होते, असे पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, पहाटेच्या शपथविधीवर मी मस्करीत भाष्य केले होतं. राष्ट्रपती राजवट लागू झाली. पण मी हेच म्हणालो होतो की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत. माझ्या सांगण्यावरून जर राज्यात लागू झालेली राष्ट्रपती राजवट हटवली जात असेल, तर चांगलंच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत भाष्य केलं होतं.
राष्ट्रपती राजवट कोणत्या परिस्थितीत लागू झाली. कोणामुळे लागू झाली, याचा ही खुलासा झाला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले होते. यामुळे आता यावर पवार काय बोलणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.