Sharad Pawar : सातारा दौऱ्यावर असताना शरद पवारांना आलं रडू, नेमकं काय घडलं?

Published on -

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणात भल्याभल्यांना रडवतात. अनेकांचे राजकीय अस्तित्वच त्यांनी बंद केलं आहे. तर काहींना त्यांनी कुठंच कुठं नेऊन ठेवलं आहे. असे असताना आज शरद पवार यांनाच कार्यक्रमात रडू आल्याचे दिसून आले आहे.

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असलेले शरद पवार आज सातारा दौऱ्यावर असताना साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांना गहिवरून आल्याचे पाहायला मिळाले. यामुळे याचीच चर्चा सगळीकडे सुरू होती.

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीची माहिती ऐकत असताना शरद पवार भावूक झाले. कार्यक्रमादरम्यान रयत शिक्षण संस्थेचं कामकाज त्यांनी केलेली कामं आणि शरद पवारांचे योगदान याबद्दल चेअरमन अनिल पाटील बोलत होते. यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

ऐकत असताना शरद पवार भावूक झाले होते. या कार्यक्रमात शरद पवार म्हणाले, केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. तर मनीष सिसोदिया यांच्यावर झालेली कारवाई अन्यायकारक असल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, शरद पवार भावूक झाल्याचे दिसून आल्यानंतर याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रयत शिक्षण संस्थेत काम करताना त्यांनी ही संस्था उत्तर प्रकारे चालवली आहे. या संस्थेत आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe