Sharad Pawar : नागालँडमध्ये भाजपसोबत सरकारमध्ये का गेलात? शरद पवारांनी एकाच वाक्यात सांगितले कारण..

Ahmednagarlive24 office
Published:

Sharad Pawar : नागालँडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा विचार करत असलेल्या शरद पवार यांनी मात्र नागालँडमध्ये मात्र भाजपसोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. असे असताना आता शरद पवार यांनी यावर एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, आमचा नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा आहे. भाजपला नव्हे’, असे स्पष्टीकरण दिल आहे. यामुळे त्यांनी टाकलेल्या गुगलीमुळे त्यांच्या मनात नेमकं काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दरम्यान, नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजप सरकारला पाठिंबा दिला नाही तरी सरकार स्थापन होऊ शकते. मात्र ऱाष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीच्या सात जागा निवडून आलेल्या आहेत. यामुळे विरोधी पक्षनेतेपद मिळेल अशी शक्यता होती.

आपले आमदार हे मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देतील, भाजपला नाही, असे शरद पवार यांनी सांगितले नागालँडचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत स्थानिक नेत्यांच्या मागणीवर चर्चा करण्यात आली.

तसेच त्यानंतर बैठकीत नागालँड सरकारला पाठिंबा देणार असल्यावर शिक्कामोर्तंब करण्यात आले. यामुळे आता देशात विरोधी पक्षांचे ऐक्य व्हावं यासाठी सातत्याने शरद पवार पुढाकार घेत आहेत. तर दुसरीकडे नागालँडमध्ये राष्ट्रवादीने घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe