शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत 20 जणांचे अर्ज दाखल ! राजळे अन प्रतापराव ढाकणे आज भरणार उमेदवारी अर्ज

महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्षातील जाहीर उमेदवारांच्या माध्यमातून आता उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. आज मंगळवार उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात काल सोमवार पर्यंत वीस जणांनी 25 अर्ज दाखल केले आहेत.

Tejas B Shelar
Published:
Shevgaon Pathardi Vidhansabha Nivdnuk

Shevgaon Pathardi Vidhansabha Nivdnuk : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज नवनवीन राजकीय घडामोडी घडतं आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही गत काही दिवसांपासून अनेक अनपेक्षित राजकीय घटना पाहायला मिळाल्या आहेत. जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप आता फायनल झाले आहे.

महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्षातील जाहीर उमेदवारांच्या माध्यमातून आता उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. आज मंगळवार उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात काल सोमवार पर्यंत वीस जणांनी 25 अर्ज दाखल केले आहेत. तसेच 65 जणांनी 121 अर्ज घेतलेले आहेत. काल नऊ जणांनी 17 अर्ज घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत संदीप गोरक्षनाथ शेलार, हर्षदा विद्याधर काकडे, यशवंत साहेबराव पाटेकर, विद्याधर जगन्नाथ काकडे, सलमान ईसुब बेग, हरिभाऊ काळे, नवनाथ कवडे, गोकुळ विष्णू दौंड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

महाविकास आघाडी कडून शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांच्या गटाला देण्यात आला आहे. येथून शरद पवार गटाने प्रतापराव ढाकणे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच महायुतीकडून ही जागा भारतीय जनता पक्षाला सुटली असून येथून विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.

दरम्यान, आज भाजपाच्या मोनिका राजळे आणि शरद पवार गटाचे एडवोकेट प्रतापराव ढाकणे जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून समोर आली आहे.

खरे तर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे यामुळे ऐनवेळी आणखी कोण इच्छुक उमेदवारी अर्ज भरणार ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. खरंतर, शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा बहुरंगी होण्याची शक्यता आहे.

महायुतीकडून भाजपाच्या मोनिका राजळे, महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे एडवोकेट प्रतापराव ढाकणे, वंचित बहुजन आघाडीचे किसन चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

तसेच, अपक्ष म्हणून माजी आमदार चंद्रशेखर घुले, हर्षदा काकडे, दिलीप खेडकर व गोकुळ दौंड यांसारखें ताकतवर नेते यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. यामुळे ही लढत दुरंगी-तिरंगी नसून बहुरंगी होणार आहे. म्हणून या विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe