“अडीच वर्षात जे डॉक्टर करू शकले नाहीत ते १५ दिवसात शिंदेंनी करून दाखवलं”

Published on -

मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेतील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टीका टिपण्णी करताना दिसत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी ट्वीट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.

अडीच वर्षात जे डॉक्टर करू शकले नाहीत ते १५ दिवसात एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं. साहेबांना ठणठणीत बरे केले. आता ते  रोज प्रत्यक्ष भेटून मीटिंग घेऊ लागलेत, असं ट्वीट करत शहाजी पाटलांनी उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे हे जनतेला भेटत नव्हते. घरातून बाहेर पडत नव्हते. बैठका वगैरे घेत नव्हते असे एक ना अनेक तक्रारी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केल्या होत्या. यापूर्वी भाजपने देखील यावरुन उद्धव ठाकरेंवर अनेकदा ताशेरे ओढले होते. आता शहाजी पाटलांनी देखील उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe