ठाकरे सरकारला जे जमलं नाही ते शिंदेंनी करुन दाखवलं; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना टोला

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : राज्यातील नवे सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा केली आहे. सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत. शिंदे सरकारने घेतलेल्या निर्णयावरुन खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.

जनतेच्या हिताचे हे सरकार आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता सरककारने थेट सरपंच पदाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेतला आहे. आता थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार आहे. राज्य सरकारचे आभार. मागच्या सरकारला जे जमलं नाही ते या सरकारने केल, असे म्हणत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना चांगलाच टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आधीचे उद्धव ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय पुर्णपणे फिरवले असल्याचे दिसून आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ८ निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे ठाकरे सरकारच्या काळातील ५ निर्णय शिंदे-फडणवीसांनी फिरवले आहेत. आगामी काळात राज्य सरकार जनतेला दिलासा देणारे निर्णय घेईल, असेही शिंदे यांनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe