शिर्डी मध्ये आमची दहशतच आहे, पण…..; सुजय विखे पाटील यांचा पलटवार !

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ येथील लक्ष्मीनगर भागात आयोजित प्रचार सभेत सुजय विखे पाटील यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. तसेच विरोधकांकडून शिर्डीमध्ये विखे परिवाराकडून दहशत होत असल्याचा जो आरोप लगावण्यात आला आहे यावरही त्यांनी भाष्य केले आहे.

Shirdi Politics News : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सबंध महाराष्ट्रात जोरदार प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे फायर ब्रँड नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात देखील महायुती आणि महाविकास आघाडी कडून जोरदार प्रचार सुरू आहे. या मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विद्यमान आमदार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे.

खरे तर शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा विखे यांचा बालेकिल्ला. या ठिकाणी विखे यांना पराभूत करणे म्हणजे फारच अवघड बाब आहे. यामुळे विखे यांच्या या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीतील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सभा घेण्यास सुरुवात केली आहे.

महाविकास आघाडी मध्ये समाविष्ट असणारे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील शिर्डी मध्ये सभा घेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

थोरात यांच्या समवेत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या माध्यमातून मात्र शिर्डीमध्ये विखे कुटुंबाची दहशत आहे असा आरोप केला जात आहे. दरम्यान याच साऱ्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ येथील लक्ष्मीनगर भागात आयोजित प्रचार सभेत सुजय विखे पाटील यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. तसेच विरोधकांकडून शिर्डीमध्ये विखे परिवाराकडून दहशत होत असल्याचा जो आरोप लगावण्यात आला आहे यावरही त्यांनी भाष्य केले आहे.

या प्रचार सभेत बोलताना माजी खासदारांनी विखे परिवाराची शिर्डीत दहशत असल्याचा आरोप करण्यात येतो. होय, आमची येथे दहशत आहे. पण ती गुंडांवर, महिलांची छेड काढणाऱ्यांवर. आमची दहशत जनकल्याणासाठी, गोरगरिबांच्या हितासाठी, कुणालाही वेदना होऊ नयेत, यासाठी असल्याचा पलटवार केला आहे.

यामुळे माजी खासदार सुजय विखे यांच्या या वक्तव्याची सध्या मतदारसंघात मोठी चर्चा सुरू आहे. या प्रचार सभेत पुढे बोलताना सुजय विखे पाटील यांनी, साई मंदिरातील फुले बंद केल्याचा आमच्यावर आरोप करण्यात येत आहे. आरोप करणाऱ्यांनी साई समाधीवर हात ठेवून हा आरोप करावा, असे थेट आव्हान दिले आहे.

तसेच साई मंदिरातील फुले उच्च न्यायालयाच्या आदेशाने बंद झाली आहेत. ही फुले पुन्हा सुरू व्हावीत, यासाठी विरोधक नाही तर विखे पाटील कोर्टात गेले. याबाबत २६ ऑक्टोबरला सुनावणी झाली. याचा निकाल अजून प्रलंबित आहे.

पण, लवकरच याबाबतचा निकाल लागेल व साईबाबांच्या कृपेने न्यायालय फुले सुरू करण्यासाठी अनुमती देईल असे म्हणतं या प्रकरणातील आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. यावेळी विखे पाटील यांनी लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, सीता नगर तसेच शासकीय जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी घोषणा देखील केली आहे.

सुजय विखे पाटील यांनी या भागातील जमिनीत प्रत्येकी अर्धा गुंठा जागा देण्यात येणार असे म्हटले आहे. या जमिनीचे बाजारमूल्य चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपये असून या भागातील प्रत्येक घरातील एका व्यक्तीला थीम पार्कमध्ये रोजगार देऊ अशी मोठी घोषणा यावेळी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe