Shivsena Symbol : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची पहिली राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी शिवसेनेचे आमदार उपस्थित होते. पक्ष आणि धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची पहिलीच राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक मुंबईत पार पडली.
या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये कोणाला कोणती पदे मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे मुख्यनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यापुढे शिवसेना पक्षाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार आहेत.

तसेच या बैठकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही आक्षेपाहार्य वक्तव्य केल्याने याबाबत कार्यकारणीच्या बैठकीत निषेधाचा ठराव करण्यात आला.तसेच येणाऱ्या काळात भाजप-शिवसेना युती करून लोकसभेच्या निवडणुकीत 45 तर विधानसभेच्या निवडणुकीत 200 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला.
दरम्यान, शिवसेनेची पुढची वाटचाल कशी असेल? या विषयावर चर्चा झाली असून एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे मुख्यनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे आता शिवसेना हे नाव आणि चिन्ह हे शिंदे यांच्याकडे राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान, चर्चगेट रेल्वे स्टेशनला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देण्याचा निर्णय. राज्यातील भूमीपूत्रांना ८० टक्के नोकरी देणे. सर्व प्रकल्पात भूमीपूत्रांना ८० टक्के नोकरीमध्ये स्थान देण्याचा निर्णय. मराठी भाषेला अभीजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न. UPSC आणि MPSC च्या मराठी मुलांना भक्कम पाठिंबा देण्याचा निर्णय, असे निर्णय घेण्यात आले आहेत.