Shivsena Symbol : ‘दिल्लीतील महाशक्तीने वचन दिलेले, चिन्ह पक्षाचा सातबारा तुमच्या नावावर करू, हर कुत्ते के दिन आते हे’

Shivsena Symbol : काल राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचे नाव मिळाले आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

उद्धव ठाकरे यांना यामुळे नाव आणि चिन्ह देखील गमवावे लागले आहे. यामुळे आता ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

ते म्हणाले, तीन लोकांनी खुर्च्यांवर बसून हा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाचा गळा दाबून निर्णय घ्यायला भाग पाडले आहे, हर कुत्ते के दिन आहे है, असेही ते म्हणाले. दिल्लीतली महाशक्ती आहे, त्यांनी यांना वचन दिले.

चिन्ह आणि पक्षाचा सातबारा तुमच्या नावावर करून देऊ. हर कुत्ते के दिन आते है, ही म्हण आहे. कोकणात जशी माकडं येतात, तसे हत्तीही घुसतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्हीही शिंदे यांना मिळाल्याने आता चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या राजकारणाला मोठं वळण देणारा निर्णय आता जाहीर झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe