श्रीगोंदा : राहुल जगताप म्हणतात शरद पवार साहेबांनी विधानसभेसाठी कामाला लावलंय, अन शेलार म्हणतात जनतेने मला तिकीट दिलंय; कोणाला मिळणार तिकीट ?

नगर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातल्या त्यात श्रीगोंदाबाबत बोलायचं झालं तर येथील राजकीय वातावरण फारच ढवळून निघाले असून दररोज नवीन डेव्हलपमेंट पाहायला मिळत आहे. श्रीगोंदा मतदार संघातुन निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये उमेदवारांची भाऊ गर्दी होत आहे.

Tejas B Shelar
Published:
Shrigonda News

Shrigonda News : पुन्हा एकदा निवडणुकीचे रण सजणार आहे. लवकरच विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होणार आहे. या रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. राजकीय नेत्यांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महा विकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. 12 विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे.

नगर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातल्या त्यात श्रीगोंदाबाबत बोलायचं झालं तर येथील राजकीय वातावरण फारच ढवळून निघाले असून दररोज नवीन डेव्हलपमेंट पाहायला मिळत आहे. श्रीगोंदा मतदार संघातुन निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये उमेदवारांची भाऊ गर्दी होत आहे.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात 2014 पासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात अटीतटीची लढत होत आहे. 2014 मध्ये या जागेवरून सध्या शरद पवार गटात असणारे राहुल जगताप विजयी झाले होते. 2019 मध्ये या जागेवरून भारतीय जनता पक्षाचे बबनराव पाचपुते हे विजयी झालेत.

पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घनश्याम प्रतापराव शेलार यांचा 4750 मतांनी पराभव केला होता. लढत अटीतटीची झाली होती. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतही श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थात शरद पवार गटाला दिला जाईल अशी शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर आज माजी आमदार अन श्रीगोंदा कुकडी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राहुल जगताप यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. महत्त्वाचे म्हणजे जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी साहेबांनी कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याचा दावा केला आहे.

यावेळी जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील आठ मतदारसंघ शरद चंद्र पवार राष्ट्रवादीच्या वाटेला येतील आणि श्रीगोंदा मतदारसंघातून राहुल भैया निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असा मोठा दावा केला आहे. तर दुसरीकडे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

फक्त इच्छुकच नाहीत तर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. यासाठी शेलार हे नुकत्याच काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना भेटले आहेत. यामुळे जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेतली असली आणि त्यांचे कार्यकर्ते पवार साहेबांनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत असे म्हणतं असतील तरी या जागेवरून पवार साहेब कोणाला संधी देणार ही गोष्ट पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.

निवडणुकीबाबत बोलताना शेलार यांनी आम्ही पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेत आहोत, मात्र जनतेने आम्हाला तिकीट दिलं आहे. त्यामुळे या निवडणुकीतून माघार घेणार नाही, यापूर्वी दोनदा इतरांसाठी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. मात्र यंदा जनतेचा आग्रह असल्याने आम्ही निवडणूक लढवणारच आहोत, असे म्हणतं निवडणूक लढवायची म्हणजे लढवायची हे स्पष्ट केले आहे.

अर्थातच शरद पवार गटाकडून शेलार यांना तिकीट मिळाले नाही तरी देखील ते निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला दिसू शकतात. यामुळे शेलार यांची ही भूमिका पाहता आता शरद पवार नेमका कोणता निर्णय घेणार? याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe