श्रीगोंद्यात जेव्हा-जेव्हा असं घडलं तेव्हा पाचपुतेचं विजयी झालेत ! विक्रम पाचपुते यांनी सांगितला श्रीगोंद्याचा आजवरचा राजकारणाचा इतिहास

खरेतर, विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे सध्या आजारी आहेत आणि याच कारणांमुळे यावेळी ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नाहीत. मात्र, पाचपुते यांच्या बालेकिल्ल्यात पाचपुते घराण्यालाच उमेदवारी देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतलाय.

Tejas B Shelar
Published:
Shrigonda Politics News

Shrigonda Politics News : श्रीगोंदा हा अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेतला विधानसभा मतदारसंघ. जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील श्रीगोंदा हा मतदार संघ भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी पक्षापेक्षा बबनराव पाचपुते यांना अधिक मानले जाते.

बबनराव पाचपुते यांना मानणारा एक मोठा गट मतदार संघात आहे. यामुळे बबनराव पाचपुते देतील तोच उमेदवार पुन्हा आमदार करू, असे म्हणतं सध्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती सुरू आहे.

खरेतर, विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे सध्या आजारी आहेत आणि याच कारणांमुळे यावेळी ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नाहीत. मात्र, पाचपुते यांच्या बालेकिल्ल्यात पाचपुते घराण्यालाच उमेदवारी देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतलाय.

यावेळी पक्षाने बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाचपुते यांना तिकीट दिले आहे. महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांच्याकडून प्रचार सभांचा झंझावातही सुरू आहे. काल विक्रम पाचपुते यांनी साकत, वाळूंज, रुईछत्तीशी येथे दौरा केला.

या दौऱ्याला सर्वसामान्य नागरिकांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. यावेळी बोलतांना विक्रम पाचपुते यांनी, ‘विधानसभा निवडणुकीमध्ये मला उमेदवारी मिळेल असे वाटले नव्हते. आम्ही दादांसाठी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होतो.

परंतू, उमेदवारी आईला मिळाली. पहिल्याच यादीत नाव जाहीर झाले. दादा आजारी असल्याने संपूर्ण मतदारसंघात आईला फिरणे शक्य नव्हते. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार शेवटच्या क्षणी माझी उमेदवारी फायनल झाली. माजी मंत्री बबनराव पाचपुते आमदार, मंत्री राहिले आहेत. त्यांनी श्रीगोंदा मतदारसंघाचा विकास केला.

जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वाधिक निधी श्रीगोंदा मतदारसंघात आणला आहे. दादांनी विकासाचे व्हिजन घेऊन काम केले. परंतू, आता विरोधकांकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही. केवळ पाचपुते परिवाराकडून होत असलेला श्रीगोंद्याचा विकास रोखण्यासाठी एकत्र आले आहेत.

परंतू, श्रीगोंद्यात आत्तापर्यंत झालेल्या बहुरंगी लढतीत पाचुतेच विजयी झाले आहेत हा आजपर्यंतचा इतिहास आहे,’ असं म्हणतं यंदाही श्रीगोंद्यामध्ये बहुरंगी लढत होत असून यामध्ये माझा विजय पक्का आहे असा विश्वास व्यक्त केला आहे. पुढे बोलताना विक्रम दादांनी, ‘विरोधकांकडे विकासाचा मुद्दाच नाही.

आपल्याकडे व्हिजन आहे. 143 गावांचा संपूर्ण अभ्यास केलाय. निधी कसा आणायचा हे माहित आहे. मतदारसंघाची विकासासाकडे वाटचाल सुरु आहे. त्यात खंड पडू देऊ नका असे सांगत मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा आपल्या विश्वासाला तडा जावू देणार नाही,’ असं म्हणतं मतदारसंघातील जनतेला विकासाची ग्वाही दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe