ठरलं ! श्रीगोंदा मतदारसंघासाठी शरद पवार गटाकडून ‘हा’ उमेदवार फायनल

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ असून यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक मोठी काटेदार होणार असे दिसत आहे. या मतदारसंघात आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल ? याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

Tejas B Shelar
Published:
Shrigonda Sharad Pawar Candidate

Shrigonda Sharad Pawar Candidate : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. खरे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीला मात्र लोकसभा निवडणुकीत चांगली जबरदस्त कामगिरी करता आली आहे.

यामुळे महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स कमालीचा वाढला आहे. आता दोन्हीही गट आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जय्यत तयारी करत आहेत. अहमदनगर मध्येही महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ असून यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक मोठी काटेदार होणार असे दिसत आहे. या मतदारसंघात आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल ? याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. महाविकास आघाडी कडून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी कोणाची वर्णी लागू शकते याचे संकेत मिळु लागले आहेत. खरंतर महायुतीमध्ये या जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत हे काही वेगळे सांगायला नको. विद्यमान आमदार बबनराव पाचपुतेसह इतरही मंडळी महायुतीमध्ये या जागेसाठी इच्छुक आहे.

महाविकास आघाडी कडून मात्र यावेळी माजी आमदार राहुल जगताप यांना संधी मिळू शकते. शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप यांनी नुकतीच माळेगावमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज शरद सभागृह येथे शेकडो कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे.

याच शिष्टमंडळात समाविष्ट असणाऱ्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी राहुल जगताप यांना कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर अहमदनगर जिल्ह्यातील बारा पैकी आठ जागांवर शरद पवार गटातील उमेदवार उभे राहतील असा देखील दावा या शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी केला आहे.

यावेळी शरद पवार यांनी राहुल जगताप यांना कामाला लागा अस सांगत आता आणलेली साकळाई आणि कुकडी बोगद्याचा प्रश्नांच निवेदन न देता थेट आमदार होऊनच हे प्रश्न मार्गी लावा असे आवाहन जगताप यांना केले असल्याचे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सांगितले गेले आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार उभा राहील असे जाहीर केले होते. पण, आघाडी मधील तिन्ही पक्ष मिळून उमेदवार ठरवला जाणार असल्याने राऊत यांनी एकट्याने उमेदवारी घोषित करण्याबरोबर नसल्याचेही पवार यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2019 च्या निवडणुकीत या जागेवर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी टफ फाईट पाहायला मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घनश्याम प्रतापराव शेलार यांचा अवघ्या 4750 मतांनी पराभव झाला होता.

येथून गेल्यावेळी भाजपाचे बबनराव पाचपुते विजयी झालेत. अटीतटीच्या या लढतीत पाचपुते यांनी बाजी मारली असली तरी देखील गेल्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रात मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन मोठ्या पक्षांमध्ये उभी फूट पडली आहे.

दोन पक्ष फुटल्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली आणि प्रथमच आता विधानसभेची निवडणूक होणार आहे. यामुळे या निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात काटेदार लढाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान महाविकास आघाडी कडून ही जागा शरद पवार गटाच्या वाटेला येणार आणि येथून राहुल जगताप उभे राहणार अशी बातमी समोर आली आहे.

जगतापांना कामाला लागण्याचे आदेश खुद्द शरद पवार यांनी दिले असल्याचे बोलले जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2014 मध्ये राहुल जगताप हे येथून विजयी झाले होते, 14 च्या निवडणुकीत त्यांनी बबनराव पाचपुते यांचा पराभव केला होता. यामुळे 2024 ची विधानसभा निवडणूक देखील बबनराव पाचपुते विरुद्ध राहुल जगताप अशी झाली तर कोण वरचढ ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe