नगर जिल्ह्यातील काही नेत्यांनी ईडी मागे लागेल म्हणून तर काहींनी वेडेपणामुळे काँग्रेस सोडली

Ahmednagarlive24 office
Published:

राज्याचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीने जिल्ह्यातील काँग्रेस मजबूत झाली आहे,त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत,

राहुरी श्रीरामपूरला सुद्धा मोठा निधी देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून मी करीत आहे,असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी करून काहींनी ईडी मागे लागेल म्हणून तर काहींनी वेडेपणामुळे काँग्रेस पक्ष सोडला अशी टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे व माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे नाव न घेता केली आहे.

मंगळवारी देवळाली शहर परिसरात दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचा प्रारंभ आमदार कानडे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी समर्थ बाबूराव महाराज सभामंडपात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण होते.

यावेळी इंद्रभान थोरात,अमृत धुमाळ,देवळाली चे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण,अशोक कानडे, विश्वास पाटील,जिल्हा सचिव अजय खिलारी,अंकुश कानडे,राजू बोरुडे,बाळासाहेब आढाव,नानासाहेब कदम,भगवान गडाख,किरण चव्हाण,मेजर शरद चव्हाण,

राजेंद्र चव्हाण,अंकुश कानडे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार कानडे म्हणाले काँग्रेस पक्ष हा गोरगरीब,दलित,पीडित,अल्पसंख्याक शेतकरी, शेतमजूर यांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे,काँग्रेसची वैभवशाली परंपरा आहे,या पक्षाने देश उभा केला आहे,

अनेक नेते निर्माण केले आहेत,दुर्दैवाने अनेकांना हे कळून देखील त्यांनी या पक्षाला सोड चिठ्ठी दिली त्यामागचे कारण आता लपून राहिलेले नाही तर काहींना काही कळत नसताना ज्यांना पक्षाने आमदार केले होते त्यांनी मात्र आपल्या वेडेपणा मुळे काँग्रेसला रामराम केला अशी टीका माजी मंत्री विखे व माजी आमदार कांबळे यांचे नाव न घेता केली.

तालुक्याच्या सर्वांगीण विकास करणे हे माझे ध्येय आहे.मी सरकार मध्ये काम केल्याने मला अनेक गोष्टी माहीत आहेत. कोरोनामुळे अडचणी आल्या आता मात्र मी न थांबता काम करणार आहे प्रास्ताविक शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे यांनी केले. वैभव गिरमे यांनी सूत्रसंचालन केले.राजेंद्र बोरुडे यांनी आभार मानले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe