डॉ. सुजय विखे पाटील यांना नगर दक्षिणमधून तिकीट मिळणार नाही ? खासदार महोदय यांच्या ‘त्या’ वक्तव्याने वेधले लक्ष

Published on -

Sujay Vikhe Patil : सध्या संपूर्ण देशभरात आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. खरेतर मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे आणि कोणत्याही क्षणी भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत.

त्यामुळे राजकीय पक्षांनी आता लोकसभा निवडणुकांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. बीजेपीने नुकतीच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

यामध्ये बीजेपीच्या केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. अनेक केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळाले नसल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील महायुतीमधून बीजेपीच्या वाट्याला असलेल्या नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांना देखील या जागेवरून तिकीट मिळणार नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांना आता अजून हवा मिळाली आहे. खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नुकतेच शिर्डीत भाषण करताना एक मोठं वक्तव्य केलं आहे.

यामुळे सुजय विखे पाटील यांना पक्षश्रेष्ठींकडून तिकीट मिळणार नाही हे कळले आहे की काय ? अशा चर्चा सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. दरम्यान आता आपण सुजय विखे पाटील यांनी नेमके काय म्हटले आहे हे थोडक्यात समजून घेणार आहोत.

काय म्हटलेत खासदार महोदय ? 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नुकताच राहता शहरात महिला बचत गटाला साहित्य आणि निधी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. हा कार्यक्रम खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे.

यावेळी त्यांनी बोलताना एक महत्त्वाचे विधान केले आहे. खासदार महोदय यांनी म्हटले की, “आमच्यावर झालेल्या प्रत्येक आरोपांना मी दोन महिन्यांनी उत्तरं देईन. सध्या लोकसभेची व्यस्तता आहे.

शिर्डी मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आहे. मात्र खासदार करून तुम्हीच मला लांब लोटलं. माझे दोन महिने होऊ द्या. नंतर मी कायमचा इकडे येईन.

काळजी करू नका.” दरम्यान खासदार महोदयांच्या या सूचक वक्तव्यामुळे सध्या नगरच्या राष्ट्रीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. सुजय विखे पाटील यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळणार नाही का ? पक्षश्रेष्ठींकडून त्यांना तशी माहिती मिळाली आहे का ? अशा चर्चा सध्या सुरू आहेत.

यामुळे आता नगर दक्षिण लोकसभेसाठी बीजेपीच्या उमेदवाराचे नाव केव्हा जाहीर होते आणि या जागेसाठी खासदार महोदय यांना पुन्हा तिकीट मिळते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe