Maharashtra News : राजकारण, समाजकारणात काम करत असताना अजित पवार यांनी कोणत्याही जाती-धर्मामध्ये भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन काम केले असल्याचे प्रतिपादन सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.
शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होलार समाज मंदिरास सुनेत्रा पवार यांनी भेट दिली. या वेळी होलार समाजाच्या वतीने सुनेत्रा पवार यांचे जल्लोषात स्वागत करत सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना पवार म्हणाल्या, बारामतीत उभारण्यात आलेले होलार समाज मंदिर ही वास्तू अतिशय सुंदर आहे.
शहरातील प्रत्येक माणूस अजितदादांसाठी कुटुंब असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या, होलार समाजाने एकजूट दाखवत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभे असल्याचे दाखवून दिले. हे भक्कम पाठबळ दिल्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी समस्त होलार समाजाचे आभार मानले.
या प्रसंगी होलार समाजाचे राष्ट्रीय नेते माणिक भंडगे, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, शहराध्यक्ष जय पाटील, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, युवकाध्यक्ष अविनाश बांदल, महिला शहराध्यक्षा अनिता गायकवाड, मा. उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर, सेवा दलाचे अध्यक्ष अॅड. धीरज लालबिगे, नगरसेवक संजय लालबिगे, कुंदन लालबिगे, साधू बल्लाळ, विशाल जाधव, पार्थ गालिंदे,
होलार समाजातील बाळासाहेब देवकाते, रामचंद्र गोरे, बाळासाहेब जाधव, नारायण ढोबळे, शांताराम गुळवे उपस्थित होते. या वेळी माणिक भंडगे, सुभाष सोमाणी, सचिन सातव, धीरज लालबिगे, हिरामण माने, सूरज देवकाते यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविका राष्ट्रीय होलार समाज संघाचे बारामती तालुकाध्यक्ष सूरज देवकाते यांनी केले.