पारनेर तालुक्याचे नेतृत्व सुजित झावरे यांच्या हाती देऊ – डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यात स्व. वसंतराव झावरे यांनी विचारांची लढाई केली. कोणापुढेही ते नतमस्तक झाले नाही.

विचारांची लढाई विचारांनी लढायची असते आणि कामे मार्गी लावायची असतात ही परंपरा स्व. वसंतराव झावरे, नंदकुमार झावरे, विजय औटी यांनी घालून दिली.

आज तालुक्यात उलटी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात नव्या समिकरणांना जन्म घालावा लागेल आणि अपप्रवृत्तींचा बंदोबस्त करावा लागणार आहे. त्यासाठी सुजित झावरे यांनी दोन पावले मागे टाकली तर त्यांना नक्कीच ताकद देऊ आणि नव्या समिकरणांना जन्म घालताना तालुक्याचे नेतृत्व सुजित झावरे यांच्या हाती देऊ, असा विश्वास खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने वासुंदे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांच्यासह माजी आमदार विजय औटी,

मा. सभापती काशिनाथ दाते, अशोक सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाय कोरडे, राणीताई लंके, वसंतराव चेडे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहोकले,

खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष बाबासाहेब खिलारी, माजी सभापती गणेश शेळके, अर्जुन भालेकर, शंकर नगरे, दिपक पवार आदी उपस्थित होते. या वेळी मा. जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी मनोगत व्यक्त केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe