Maharashtra Politics : राज्यातील सत्तेवर असलेले महायुती सरकार नुसते घोषणाबाजी करणारे सरकार !

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra Politics

Maharashtra Politics : राज्यातील सत्तेवर असलेले महायुती सरकार नुसते घोषणाबाजी करणारे सरकार असून कामांवर कोट्यवधी रुपये खर्चाची आकडेवारी ही नुसती कागदावरच आहे. कामासाठी आकडे कोटीचे; पण कामे शून्य, अशी अवस्था राज्यातील सत्तेवर असलेल्या सरकारची झाली असल्याची टीका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.

आमदार तनपुरे काल १ कोटी ८५ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रम व मल्हारवाडी खिंडीत राहुरी ते ताहाराबाद रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ व मल्हारवाडी खिंड ते गाडे वस्ती रस्त्याचे कामाच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी केशवराव गाडे होते. यावेळी कारखान्याचे माजी संचालक नारायण जाधव बाळासाहेब गाडे, भाऊसाहेब गाडे, मल्हारवाडीचे सरपंच बाजार समितीचे संचालक मंगेश गाडे, मोमीन आखाड्याचे सरपंच रावसाहेब शिंदे, घोरपडवाडीचे सरपंच मंजाबापू शेडगे, वसंतराव गाडे, हरिभाऊ हापसे उपस्थित होते.

आमदार तनपुरे म्हणाले की, विविध विकास कामांना महायुती सरकारने स्थगिती दिलेली होती. न्यायालयाने या कामांवरील स्थगिती उठवली. रस्त्याच्या कामांना शासन एकदाच निधी देत असते. मिळालेल्या निधीचा योग्य वापर करून रस्त्याची कामे दर्जेदार करावी, असे आवाहन आमदार तनपुरे यांनी केले.

या भागातील सर्वच रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. राहुरी ताहाराबाद रस्त्यावरील अंतिम टप्प्याचे काम अतिशय निकृष्ट झालेले असून त्या कामाची चौकशी केली जाईल. ठेकेदारांनी काम दर्जेदार करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी नारायण जाधव, राजेंद्र सरोदे, सरपंच रावसाहेब शिंदे, सरपंच मंजाबापू शेंडगे, सुनील लोंढे, राधु येवले, रावसाहेब शेडगे, वसंतराव गाडे, केशवराव गाडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अण्णासाहेब हापसे, सुनील गावडे, राजेंद्र डोंगरे, स्वप्नील जाधव, राजेंद्र घाडगे, देवराम सागर, बाबासाहेब जाधव, जालिंदर गावडे, ठेकेदार रुपेश सुराणा, स्वप्नील भास्कर, प्रकाश गुंड आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe