Maharashtra Politics : आरक्षण देऊ शकणार नाही हे शिंदे सरकारने जाहीर करावे !

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra Politics

Maharashtra Politics : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देता येते. आघाडी सरकारच्या काळात असे आरक्षण देण्यात आले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जर घटनादुरुस्ती करण्याची वेळ आली, तर त्याला आमचे समर्थन असणार आहे.

मात्र, जर शिंदे सरकार हे आरक्षण देणार नसले, तर तसेच सरकारने जाहीर करावे, असे आव्हान राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिले आहे.

जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने चव्हाण आज पुण्यात आले होते. काँग्रेस भवन याठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार दीप्ती चौधरी, रमेश बागवे, माजी नगरसेवक गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार गंभीर आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी ज्या त्रुटी सर्वोच्च न्यायालयाने दाखवल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून कार्यवाही केली जात असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

याचा उल्लेख करताना चव्हाण म्हणाले, दिल्लीत अतिरिक्त आरक्षण देता येते. केवळ महाराष्ट्रात आरक्षण देताना अडचणी येत आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना विनाकारण मुद्दे उपस्थित केले जात आहे. त्यातून ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटविण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणे गरजेचे आहे.

केंद्र सरकार पोटनिवडणुकीचा विषय प्रलंबित ठेवत असल्याचा आरोप करताना चव्हाण यांनी भाजपवर टीका केली ते म्हणाले, पुण्यातील पोटनिवडणूक ही प्रलंबित ठेवण्यात आली आहे. लोकसभेचा कार्यकाल संपण्यापूर्वी ही निवडणूक होणे गरजेचे होते.

मात्र, कसब्यातील पराभव हा भाजपला जिव्हारी लागला आहे. त्यामुळे एक निवडणुकीचा मुद्दा समोर आणून निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत.इंडिया आघाडीमुळे भाजपला पराभव समोर दिसत आहे. त्यातून लोकशाही संपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एक निवडणूक आणून मोठे मतदान यंत्रांचे मोठा ठेका कोणाला दिला जाणार आहे. हे तपासून पाहावे लागणार असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. इंडिया आघाडी ही १९७७ च्या जनआंदोलनाप्रमाणे मोदीचा पराभव करणार हे निश्चित आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe