रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला; मुखमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Published on -

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभागृहातील भाषणावरुन टीका केली.

खूप वेगाने धावत असल्याने त्यांचे ब्रेक फेल गेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘हे सरकार सर्वसामान्यांचं असल्याने रिक्षाने मर्सिडीजला मागे टाकलं आहे. आम्ही सर्व घटकातील लोकांना न्याय देणार आहोत. प्रत्येकाला आपलं सरकार आहे असे वाटेल अशा पद्धतीने आम्ही कामगिरी करू. हाच मुख्य फरक असेल’, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान, अधिवेशनातील भाषणातून हा सगळा कट कधी आखण्यात आला होता हे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री त्यांना सारखे थांबा असं सांगत होते, पण गाडीचे ब्रेक फेल गेले होते, ते कसे थांबणार? याआधी ते आम्हाला तीन चाकांचं महाविकास आघाडी सरकार म्हणत होते. पण आता तीन चाकी चालवणारा सरकार चालवत आहे, असे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना उद्देशून म्हणाले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News