Ahmednagar Politics : कार्यकाळ संपत आला अन आता म्हणे विरोधी पक्षनेते पद घ्या !! इच्छुक नगरसेवक भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावरून अहमदनगर शहरातील महापालिकेचे वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. त्याचे कारण असे की, आता डिसेंबर अखेर नगरसेवकांचा कार्यकाळ संपणार आहे.

म्हणजे अवघे काही दिवस कार्यकाळ संपायला शिल्लक असताना भाजपला विरोधी पक्षनेता हवा अशी आठवण झालीये. व आता इतक्या उशिरा पद घेण्यावरून मात्र नगरसेवकांत नाराजी आहे.

त्यामुळे आता स्थानिक भाजपच्या भूमिकेविषयी वेगवेगळा शंका उपस्थित केल्या जात आहेत.

* स्थानिक भाजपच्या नेतृत्वाबाबत साशंकता?

सध्या नगरसेवकांमध्ये स्थानिक भाजपच्या नेतृत्वाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. याचे कारण असे की, भाजप नगरसेवकांच्या मागणीनुसार महापौर रोहिणी शेंडगे यांनी माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांना विरोधी पक्षनेता म्हणून अधिकृत पत्र दिले होते.

मात्र, कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच नगरसेवक भैय्या गंधे यांनी या नियुक्तीला आक्षेप घेतला. पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांसह राज्यातील पदाधिकाऱ्यांपर्यंत हा वाद पोहोचला. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार महिन्यांपूर्वीच याबाबत बैठक घेऊन तोडगा काढा असे आदेश दिले होते.

परंतु आजतागायत यावर काहीच चर्चा झाली नाही. कुणालाही पदभार दिला नाही. आणि आता डिसेंबर अखेरीस नगरसेवकांचा कार्यकाळ संपत असताना भाजपला विरोधी पक्ष नेते पदाची आठवण झाली.

त्यामुळे आता इच्छुक नगरसेवकांमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वाच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच आता पक्षाने विरोधी पक्ष नेते पद घेऊ नये असे नगरसेवकांनी म्हटले आहे.

* बैठकीत पद न घेण्याचा निर्णय

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर म्हणाले आहेत की, विरोधी पक्षनेते पदाबाबत काही लोक इच्छुक होते. यामुळे विरोधी पक्ष नेते पदाबाबत पक्ष पातळीवर चर्चा होऊन निर्णय होणे अपेक्षित होते.

त्यानुसार बैठक बोलवण्यात आली व सर्वांनी एकत्रितपणे पद न घेण्याचा निर्णय घेतला. पदाबाबत निर्णय घ्यायचा अधिकार हा पक्षाचा आहे. त्यानुसार बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला असेही आगरकर म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe