Radhakrishna Vikhe Patil : निळवंडे धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून गावात आले, हीच खरी आपल्यासाठी दिवाळी !

Ahilyanagarlive24 office
Published:

Radhakrishna Vikhe Patil : निळवंडे धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून गावात आले, हीच खरी आपल्यासाठी दिवाळी ठरली आहे. वर्षानुवर्षांची पाण्याची प्रतिक्षा आता संपली आहे.

निळवंड्याचे पाणी मिळण्यासाठी राज्यात आपले सरकार सत्तेवर यावे लागले. शेवटच्या गावाला पाणी मिळेल, असे नियोजन करण्यात आले असून, एकही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

तालुक्यातील लोहारे येथे मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते काल रविवारी निळवंडेच्या पाण्- याचे जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी लोहारे ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांच्या वतीने मंत्री विखे पाटील यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

लोहारे आयक्ष वैभव लांडगे, शरद गोड, हरिष चकोर यांच्यासह विविध गावांचे सरपंच आणि सदस्य मोठ्या सख्येने उपस्थित होते.

प्रारंभी मंत्री विखे पाटील यांनी लोहारे गावचे ग्रामदैवत अवजीनाथ बाबा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले की, निळवंडे धरणाच्या लोकापर्णासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले. हेच आपल्या दृष्टीने मोठे भाग्य ठरले आहे.

प्रधानमंत्री आल्याने धरणाच्या भविष्यातील कामासाठी कोणत्- याही निधीची कमतरता पडणार नाही. डाव्या कालव्याप्रमाणेच उजव्या कालव्यातही लवकरच अकोले तालुक्यातील उच्च स्तरीय कालव्यांचे कामही पूर्ण झाले असून

या कालव्यातूनही पाणी देण्याचे नियोजनही नियोजनही विभागाने केले आहे. अनेक वर्षे सर्वच गावांना पाण्याची प्रतिक्षा होती. राज्यात युती सरकार आल्यानंतर या कामाला गती मिळाली.

त्यामुळेच कालव्यांद्वारे पाणी येवू शकले, ही खऱ्याअर्थाने आपल्यासाठी दिवाळी ठरली आहे. आवर्तनाचा कालावधी वाढविल्यामुळे शेवटच्या गावाला पाणी देण्याचे नियोजन असून, जलसंपदा विभागाच्या आधिकाऱ्यांनीही रात्रंदिवस घेतलेल्या मेहनतीमुळे पाणी पोहोतच असल्याचे समाधान ना. विखे पाटील यांनी व्यक्त केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe