मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट जारी केले आहे. संजय राऊतांना अटक वॉरंट जारी केल्यावरुन भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे.
संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांना अटक होणार. संजय राऊत हे धुतल्या तांदळासारखे नाहीत. राऊत यांनी कोणतातरी गुन्हा केलेला आहे, असे नारायण राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, दंडविधानातील कलम ४९९, ५०० अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या अटक वॉरंटनंतर नारायण राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत हे काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. त्यांनी कोणतातरी गुन्हा केला असेल, असे नारायण राणे म्हणाले आहेत.
मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी राऊत यांच्याविरोधात शुक्रवारी ९ जुलै रोजी जामीनपात्र अटक वॉटंर जारी केले आहे. या अटक वॉरंटमध्ये राऊत यांना १८ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.