‘त्या’ ४ जणांमुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची ही अवस्था; गुलाबराव पाटलांचा गंभीर आरोप

Published on -

मुंबई : बहुमत चाचणीनंतर राज्यात शिंदे सरकार सत्तेत आले. शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला गेला. हा प्रस्ताव जिंकण्यात शिंदे गट यशस्वी ठरला आणि शिंदे सरकार स्थापन झाले. राज्यात विशेष अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी सभागृहामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले.

त्या 4 लोकांच्या कोंडाळ्याने आमच्या उद्धव साहेबांना बावरट केलं. उद्धव ठाकरेंना आजूबाजूचे कोंडाळे दूर करण्याची विनंती करतो. तुम्हाला पट्टी बांधून जे धृतराष्ट्रासारखे सांगत आहेत त्यांना लांब करा, असेही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, गुलाबराव पाटलांनी नेमक्या कोणत्या 4 जणांची नावे घेतली? असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. गुलाबरावांनी घेतलेल्या 4 नावांमध्ये मिलींद नार्वेकर, संजय राऊत, अनिल देसाई आणि अनिल परब यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता आहे.

ज्यांची लायकी नाही निवडून यायची ते आमची मते घेऊन खासदार होतात, असेही गुलाबराव पाटील सभागृहामध्ये बोलताना म्हणाले आहेत.    

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe