पक्ष सोडणाऱ्या अशीच भाषणं करावी लागतात; राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर

Published on -

मुंबई : शिवसेनेत मोठी फूट पाहायला मिळाली. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील मतभेद आता आणखीनच तीव्र होत असल्याचे देखील पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणी जिंकल्यानंतर अभिनंदन ठरावाला उत्तर देताना तुफान फटकेबाजी केली. यावेळी शिंदे यांनी आपल्या भाषणातून अनेक खुलासे करत शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. शिंदे यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

यापूर्वी छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती. त्यांनी देखील अशाच प्रकारची भाषणं केली होती. मात्र आता त्यांची स्थिती पहा. पक्ष सोडणाऱ्यांना भावनांना हात घालणारी भाषणं करावी लागतात, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदेंना चांगलच सुनावलं आहे.

मुख्यमंत्री ज्यावेळी विश्वासदर्शक ठराव जिंकतात, त्यावेळी त्यांना आपल्या भूमिका मांडाव्या लागतात. त्यांनी राज्याची भूमिका न मांडता, त्यांनी पक्षाविरोधात बंड का केलं? यावर खुलासे दिले. नारायण राणेंचं भाषणही याच प्रकारचं होतं. छगन भुजबळांचं भाषणंही असंच होतं. पक्ष सोडणारा किंवा पक्षाशी प्रतारणा करणारा नेता ज्यावेळी भाषण करतो त्यावेळी त्याला खुलासेच द्यावे लागतात, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe