हार्ट अटॅक ब्रेन स्ट्रोक नंतर पाच महिने बेशुद्ध, विदेशी डॉक्टरांचे प्रयत्न व्यर्थ, पवारांच्या शिलेदाराचे दुःखद निधन

Ahmednagarlive24 office
Published:

Uday Shelke : अहमदनगर जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय गुलाबराव शेळके (वय ४६ वर्ष) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. यामुळे अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

उद्या सकाळी ११ वाजता पिंप्री जलसेन (ता. पारनेर) या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, मुंबईतील लीलावती रूग्णालयात विदेशातून डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. शेळके यांच्या पश्‍चात पत्नी, आई, दोन मुली असा परिवार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते विश्वासू कार्यकर्ते होते. यामुळे दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांच्यावर पुणे येथे खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले होते. तेथे त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला.

त्यामुळे गेले पाच महिने ते बेशुद्धावस्थेतच होते. आज उपचारास प्रतिसाद देणे बंद केल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आले. दीड वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अ‍ॅड. उदय शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, पारनेर सोसायटी मतदारसंघातून त्यांनी मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकली होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जीएस महानगर बँका या दोन बलाढ्य बँकांचे अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे पेलली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe