Udayanaraje : खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात सध्या जोरदार टीका टिप्पणी सुरू आहे. साता-यातील गोडॊली तळ्याच्या सुशोभिकरणावेळी खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर टिका केली होती, या टीकेला शिवेंद्रराजे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता टोलनाके चालवणारे उदयनराजे आमच्या राजघराण्यात जन्माला आलेच कसे, असा सवला उपस्थित करत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यामुळे साताऱ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

दरम्यान, टोलनाके चालवणारेच आणि अन्यायकारक या घरात कसे जन्माला आले हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे, असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांच्या जिव्हारी लागणारी टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी केल्याचे पाहायला मिळाले. यामुळे आता हा वाद अजूनच वाढण्याची शक्यता आहे.
आता शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या टीकेनंतर उदयनराजे काय उत्तर देणार याकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे. साताऱ्यात सध्या अनेक निवडणूका समोर येत आहेत. यामुळे वाद सुरू झाला आहे. विकास कामाच्या श्रेयासाठी देखील वाद होत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांचे पेंटिंग काढण्यावरून देखील सातारा शहरात वाद निर्माण झाला होता. यावेळी देखील शिवेंद्रसिंहराजे यांनी टीका केली होती. यामुळे सध्या दोन्ही नेत्यांचे समर्थक देखील समोरासमोर येत आहेत.