Udayanaraje : सातारमध्ये गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात शाब्दिक चकमक होत आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. आता साताऱ्यात खासदारांच्या पेंटिंगवरून निर्माण झालेला वाद हा बालिशपणाचे लक्षण आहे.
त्यांच्याच बगलबच्चांनी पेंटिंग काढायचे आणि लोकांचे माझ्यावर किती प्रेम आहे, असा आपणच उदो उदो करायचा हे काही खरे नाही. एवढे जर जनतेचे प्रेम असते तर लोकसभेला पडला कसे, याचे आत्मचिंतन करावे, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

यामुळे आता उदयनराजे आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, खासदारांचे पेंटिंग एखाद्या त्रयस्त व्यक्ती किंवा यंत्रणेमार्फत काढले गेले असते तर ते समजू शकलो असतो. मात्र खासदाराच्याच गाडीत बसणाऱ्या बगलबच्चांनी त्यांची पेंटिंग काढायचे आणि मी कसा लोकप्रिय आहे, हे दाखवायचे हे न समजण्याच्या पलीकडे आहे.
तसेच शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वेळीच आवरायला हवे, प्रशासनावर त्यांची कामे सोडून कायदा सुव्यवस्थेवर लक्ष द्यावे लागेल असे असे कोणतेही कृत्य करू नये, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, साताऱ्यात उदयनराजे यांच्या पेंटिंगवरून वाद सुरू झाला आहे. हे पेंटिंग काढण्यापासून पोलिसांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना रोखले होते. यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.