Uddhav thackeray : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. सध्या एकटे पडलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मातोश्रीवर आले होते. यामुळे आता ठाकरे गट आम आदमी पार्टी सोबत युती करणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
असे काही झाले तर अनेक राजकीय गणित बदलणार आहेत. या भेटीनंतर केजरीवाल म्हणाले, आम्ही देशातील परिस्थितीवर चर्चा केली. सध्या महागाई वाढत आहे. सर्वसामान्यांची कमाई वाढत नाही, पण खर्च वाढत आहे.

दुसरीकडे केंद्र सरकार काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत आहे. देशात एक पक्ष आहे जो 24 तास निवडणुकीबाबत विचार करतो. आम्ही लोकांच्या प्रश्चांचा विचार करत असतो. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यापासून शेतकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न सोडवण हे आमचे कर्तव्य आहे.
तसेच ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना खूप दिवसांपासून भेटण्याची इच्छा होती. यामुळे आम्ही आलो. या नात्याला आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि पुन्हा-पुन्हा भेटत राहू’, असेही ते म्हणाले.
असे असताना या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे राज्यात राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते आणि उद्धव ठाकरे हे त्या वाघाचा पोरगा आहे. सगळा महाराष्ट्र त्यांच्या सोबतीला आहे, असेही केजरीवाल म्हणाले.
तेसच सर्वोच्च न्यायालय देखील त्यांना न्याय देईल. तसेच आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक विजयी होतील’, अशा शुभेच्छा केजरीवाल यांनी ठाकरेंना यावेळी दिल्या. यामुळे आता राज्यात एकच चर्चा सुरू झाली आहे.