Uddhav Thackeray : ‘तुमचे बावन काय 152 कुळं जरी खाली आले तरी ठाकरेंपासून शिवसेना कुणी तोडू शकत नाही’

Published on -

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची मालेगावात सभा झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बावनकुळे आणि भाजपवर सडकून टीका केली. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपला असे वाटत असेल की, आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो, अरे तुमचे बावन काय 152 कुळं जरी खाली आले तरी ठाकरेंपासून शिवसेना कुणी तोडू शकत नाही. प्रयत्न करुन बघा. मी तर म्हणतो, हिंमत असेल तर तातडीने निवडणुका घ्या, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

तुम्ही मोदींच्या नावाने मतं मागा. मी माझ्या वडिलांच्या नावाने मत मागतो. एकनाथ शिंदे गद्दारी करुन मुख्यमंत्री झाले तरीसुद्धा कर्तृत्व शुन्य आहे. कारण अजूनही माझ्या वडिलांचे नाव तुम्हाला वापरावे लागते हा तुमचा पराभव आहे.

तसेच ते म्हणाले, ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकारणात जन्म दिला त्या राजकारणारणातल्या जन्मदात्या आईच्या कुशीवर वार करणारे हे सगळे चोर धनुष्यबाण घेऊन तुमच्यासमोर फिरणार आहेत, असेही ते म्हणाले.

आता बघुया महाराष्ट्र कुणाला कौल देतं, असेही ते म्हणाले. या सभेकडे राज्याचे लक्ष लागले होते. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. आता भाजप काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe