चुकीचे प्रवक्ते आणि सल्लागारांमुळे उद्धव ठाकरे यांना सर्व गमवावे लागले !

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिलेदारच असल्याचे सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

याप्रसंगी ते म्हणाले की, सत्ता असताना आणि गेल्यानंतरही उद्धव ठाकरे यांचा सुरू असलेला थयथयाट या निकालाने उघडा पडला असल्याचा टोलाही मंत्री विखे यांनी लगावला.

काल बुधवारी निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकारी आमदारांचा गौरव करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, हा निकाल देताना नोंदवलेली निरीक्षण खूप महत्वपूर्ण असल्याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्हणाले की,

उद्धव ठाकरे उलट तपासणीला सुद्धा सामोरे जावू शकले नाहीत, यावरूनच त्यांची स्वःताबद्दलची आणि पक्षाबदलची उदासिनता किती होती हे स्पष्ट होते. आजच्या निकालामुळे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ठरले आहेत.

केवळ चुकीचे प्रवक्ते आणि सल्लागारांमुळे उद्धव ठाकरे यांना सर्व गमवावे लागले. सता होती तेव्हाही आणि गेल्यानंतरही त्यांचा फक्त थयथयाट सुरू होता. त्यामुळे त्यांचा चेहरा उघडा पडला असल्याचे सांगून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आता सुप्रिम कोर्टातच नाही तर त्यापेक्षाही मोठ्या कोर्टात जायला त्यांना सांगितले.

सतेचा डाव मांडायचा आणि नंतर पाठीत खंजीर खुपसायाचे असेच त्यांचे राजकारण आजपर्यत आपण पाहिले असल्याचे स्पष्ट करत मंत्री विखे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe